Sanjay Nirupam | महाविकासआघाडीचं सरकार बनलं तरी ते पांगळ-संजय निरुपम | ABP Majha
Continues below advertisement
काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी काँग्रेस अध्यक्षांना दबावात निर्णय न घेण्याचा सल्ला दिला आहे. एकीकडे सत्ता स्थापनेबाबत आघाडीच्या बैठका सुरु असताना दुसरीकडे निरुपम यांनी ट्वीट करुन याबाबत भाष्य केलं आहे. ते लिहितात की, काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशात बसपासोबत आघाडी करुन काँग्रेसने चूक केली होती. तेव्हा काँग्रेस असा सपाटून मार खाल्ला की आजपर्यंत उठू शकलेली नाही. महाराष्ट्रात आपण तीच चूक करत आहोत. शिवसेनेच्या सरकारमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनणं म्हणजे काँग्रेसला दफन करण्यासारखं आहे. त्यामुळे उत्तम ठरेल की, काँग्रेस अध्यक्षांनी दबावात निर्णय घेऊ नये, असं ट्वीट पक्षाचे नेते संजय निरुपम यांनी केलं आहे.
Continues below advertisement