Sandeep Deshpande : वरळी विधानसभेतून संदिप देशपांडे निवडणूक लढणार? : ABP Majha

Continues below advertisement

आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर मनसे (MNS) अॅक्शन मोडवर आली आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी (Raj Thackeray) महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत मनसे स्वबळावर लढण्याची तयारीत आहे. राज्यातील सर्वच विधानसभा निवडणुकीचा आढावा घेऊन सव्वा 200 पर्यंत जागा लढण्याचा विचार मनसेचा आहे. या विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे राज्याचा दौरा देखील करणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या तयारीला वेग आला आहे राज्यात सध्या उमेदवारांची चाचपणीही सुरू करण्यात आली असल्याची माहिती मनसेचे नेते वैभव खेडेकर (Vaibhav Khedekar) यांनी दिली 

मनसे स्वबळावर लढणार या चर्चेबरोबरच ते महायुतीत जाणाऱ्या बाबत देखील चर्चा आहे. मात्र 2014 आणि 2019 विधानसभेसाठी मनसेला भाजप आणि काँग्रेस आघाडीने टाळी दिली होती. मात्र, अखेरच्या क्षणी पाठिंबा दिल्याने मनसेला मोठा फटका बसला. त्यामुळे या निवडणुकीत ती चूक पुन्हा मनसे करणार नसल्याचं बोललं जात आहे.दरम्यान, राज ठाकरे यांच्या स्वबळावर लढण्याच्या भूमिकेमुळे महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या सभेमुळे महायुतीला काही जागांवर फायदा झाल्याचं अनेकांचं म्हणणं होतं. मात्र, राज ठाकरेंच्या स्वबळावर लढण्यामुळे भूमिकेमुळे महायुतीचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram