Sameer Wankhede : समीर वानखेडेंचं निलंबन होण्याची शक्यता, पुन्हा CBI चौकशी
IRS अधिकारी समीर वानखेडे यांची आज पुन्हा सीबीआयकडून चौकशी करण्यात येणार आहे.. काल पाच तासांच्या चौकशीनंतर आज पुन्हा त्यांची चौकशी केली जाणार आहे... आज सकाळी ११ वाजता ते सीबीआय कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत... दरम्यान समीर वानखडे यांनी दिलेल्या जबाबाच्या आधारे 22 मे रोजी CBI उच्च न्यायालयात अहवाल सादर करणार असून वानखेडेंचं निलंबन होण्याची शक्यता आहे... आर्यन खान प्रकरणात शाहरूख खानकडे २५ कोटी रुपये मागितल्याचा आरोपांप्रकरणी वानखेडे यांची चौकशी सुरू आहे. तसेच आर्यन खानची चौकशी आणि अटकेदरम्यानच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड केली होती का, याचीही चौकशी केली जात आहे..