Sameer Bhujbal : समीर भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अजित पवार गटाच्या मुंबई अध्यक्षपदी

राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्या खांद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अजित पवार गटाच्या मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अजित पवार गटाच्या मुंबईतल्या गरवारे क्लब हाऊसमध्ये झालेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत समीर भुजबळांना राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष नवाब मलिक यांनी अजूनही आपण कोणत्या गटाच्या बाजूनं आहोत याविषयी स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola