Marathi vs Hindi : निशिकांत दुबेंपाठोपाठ आता सपाच्या खासदारांनाही कंठ फुटला
समाजवादी पक्षाचे खासदार राजीव राय यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज ठाकरे द्वेष पसरवत असून, त्यामुळे ते कधीही यशस्वी होऊ शकले नाहीत, असे राय यांनी म्हटले आहे. तसेच, राज ठाकरे यांचा मुलगाही पहिली निवडणूक हरला, असे वक्तव्य राय यांनी केले. राजीव राय यांनी राज ठाकरे यांना थेट आव्हान दिले. "ते हिम्मत है तो आप हिंदी भाषिको मारते हो, तो उर्दू भाषिको भी मारो। तमिलिअन को भी मारो।आप जो है तेलगु वाले को भी मारो।आप जो इस तरह की घटिया हरकत कर रहे हो। और मैंने हमेशा कहा है कि जब अपने घर में हो, महाराष्ट्र में हो, यदि बहुत बड़े बॉस हो, तो चलो बिहार, चलो उत्तर प्रदेश, चलो तमिलनाडा। तुमको पटक-पटक के मारेंगे। ये अनार्की जो है नहीं चलेगी," असे राय म्हणाले. मराठी लोकांनी अशा विचारधारेला नकार दिला, त्यांचे आभार मानतो, असेही राय यांनी नमूद केले. जर कोणी भाषेच्या नावावर देशाला विभाजित करण्याचा प्रयत्न करत असेल, तर हे योग्य नाही. संपूर्ण देशात प्रत्येक प्रदेशातील, प्रत्येक भाषा आणि प्रत्येक धर्माच्या लोकांना स्थान आहे. महाराष्ट्रातील लोकांनाही देशभरात स्थान आहे, असे राजीव राय यांनी स्पष्ट केले.