Sachin Ahir Full PC : भाजप मागे पडल्याचा शिंदेंच्या नेत्यांना आनंद होतोय का? -सचिन अहिर

Sachin Ahir Full PC : भाजप मागे पडल्याचा शिंदेंच्या नेत्यांना आनंद होतोय का? -सचिन अहिर

हे देखील वाचा

Devendra Fadnavis: मुंबईत ठाकरे गटाला मराठी माणसाने मतं दिली नाहीत, एका विशिष्ट समाजाच्या ताकदीवर ते निवडून आले: देवेंद्र फडणवीस

मुंबई: आपली प्रत्यक्ष मते ही वाढलेली आहेत. राज्यातले उद्योग पळवले असा नरेटीव्ह पसरवला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या काळात महाराष्ट्रात खाली होता. रोज खोटं बोलत होते की, उद्योग पळवले, अशी टीका उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. देवेंद्र फडणवीसांनी आज मुंबईत भाजपच्या सर्व आमदारांशी संवाद साधत लोकसभेच्या निकालाचं गणित समजावून सांगितलं. 

उद्धव ठाकरेंना सहानुभूती होती, मग कोकणात का दिसली नाही?, कोकणात उबाठाला एकही जागा नाही. पालघर, रत्नागिरी, ठाण्यात एकही जागा नाही. मुंबईत देखील यांना मराठी माणसांनी मतदान केलं नाही. मुंबईत यांना कुणामुळे जागा मिळाल्या, हे तु्म्हाला माहिती आहे. केवळ एका विशिष्ठ मताच्या आधारावर हे जिंकले. आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघात देखील त्यांना जास्त लीड घेता आले नाही. कोकणात उबाठाला लोकांनी हद्दपार केले आहे, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीसांनी केला. दरम्यान, मुंबईतील सहा जागांपैकी चार जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय झाला. तर 2 जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola