Chandrakant Patil : रयत शिक्षण संस्थेकडून मंत्री चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा पत्रक काढून निषेध
Continues below advertisement
रयत शिक्षण संस्थेकडून मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा पत्रक काढून निषेध करण्यात आलाय. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केल्यानंतर स्वतः आणि कुटुंबीयांच्या त्यागातून संस्थेचे काम वाढवले आणि लोकांनी त्यांच्या कार्याला भरभरून प्रतिसाद दिला. त्यांच्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी केलेले वक्तव्य दुर्देवी असल्याच रयत शिक्षण संस्थेने म्हटलय. रयत शिक्षण संस्थेच्या सातारमधील मध्यवर्ती कार्यालयाकडून हा निषेध करण्यात आलाय.
Continues below advertisement