Rahul gandhi :आरएसएस आणि सावरकरांची ब्रिटीशांना मदत,राहुल गांधींच्या सावरकरांविरोधी वक्तव्यामुळे वाद

राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सध्या भारत जोडो यात्रा सुरू आहे. ही यात्रा आज कर्नाटकात पोहोचली. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मीडियाशी संवाद साधताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सावरकरांवर निशाणा साधलाय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सावरकरांनी ब्रिटिशांना मदतच केली होती, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. स्वातंत्र्ययुद्धात सावरकर इंग्रजांसाठी काम करत होते. त्यांना इंग्रजांकडून त्याचा मोबदलाही मिळत होता असं राहुल गांधी यांनी म्हटलंय. राहुल गांधी यांच्या या आरोपावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये जुंपण्याची चिन्हे दिसत आहेत.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola