Karnatak Border Conflict : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर नवं सरकार गप्प का? रोहित पवार यांचं ट्विट
Karnatak Border Conflict : छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या कर्नाटकच्या याच मुख्यमंत्री महाशयांची हिंमत आता थेट जत तालुक्यातील गावांवर दावा सांगण्यापर्यंत गेलीय. एकीकडं सीमा भागाचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित असताना दुसरीकडं आपलं सरकार मात्र कर्नाटक सरकारच्या या नव्या भूमिकेबाबत शांत आहे. असं ट्विट रोहित पवार यांनी करत सरकारला डिवचलंय.