
Ram Shinde On Loksabha Election : मतभेद विसरुन विखेंना मदत करणार : राम शिंदे : ABP Majha
Continues below advertisement
लोकसभा निवडणुकीत पक्षांतर्गत वाद टाळण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कंबर कसलीय. राम शिंदे आणि विखे कुटुंबासोबत फडणवीसांनी काल रात्री बैठक घेतली. पक्षाने अहमदनगर दक्षिण मतदारसंघाबाबत घेतलेला निर्णयाचं स्वागत करतो, असं वक्तव्य राम शिंदे यांनी केलं. तसंच नगरचा खासदार हा भाजपचाच झाला पाहिजे अशी आपली भूमिका असून भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचं राम शिंदेंनी सांगितलं. त्यामुळे सर्व मतभेद विसरुन राम शिंदे हे विखेंना मदत करणार आहेत.
Continues below advertisement