Ram Shinde on Baramati Agro : मुदतीपूर्वीच ऊसाचं गाळप सुरु, बारामती अॅग्रोची चौकशी करा - राम शिंदे
Continues below advertisement
रोहित पवार विरुद्ध राम शिंदे पुन्हा एकदा सामना होण्याची शक्यता आहे. बारामती अॅग्रो लिमिटेडमध्ये मुदतीपूर्वीच विनापरवाना ऊसाचं गाळप सुरु झाल्याचा आरोप भाजप आमदार राम शिंदे यांनी केलाय. गाळप हंगाम 15 ऑक्टोबरला सुरु होणार असताना बारामती अॅग्रो कंपनीनं 10 ऑक्टोबरलाच गाळप हंगाम सुरु केला. त्यामुळे परवानगी न घेता 15 ऑक्टोबरपूर्वीच साखर कारखाना सुरु केल्यानं गुन्हा दाखल करावा अशी मागणी राम शिंदेंनी केलीय. याबाबतची तक्रार साखर आयुक्तांकडे देखील केलीय. राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी तातडीनं एक आदेश काढलाय. 13 ऑक्टोबर पर्यंत राज्यात कोणत्याही प्रकारच्या उस वाहतुकीवर बंदी घालण्यात आलीय. उस वाहतूक होताना आढळल्यास कारवाई करण्यात येईल असं आदेशात म्हंटलंय.
Continues below advertisement