हिंदू समाजाला सरकारकडून दुजाभाव वागणूक, घाटकोपरमध्ये दहीहंडी निश्चित साजरी होणार : Ram Kadam
Continues below advertisement
राज्यात कोरोनाचे सावट अजूनही दूर झालेले नाही, याच पार्श्वभूमीवर यंदा देखील दही हंडी उत्सव साजरा करता येणार नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मात्र यावर भाजपच्या नेत्यांनी कडाडून विरोध करत हा उत्सव साजरा करणार असल्याचे म्हटले आहे. नुकतंच राम कदम यांनी माध्यमांशी बोलताना ठाकरे सरकार हिंदूंना दुजाभावाचा वागणूक देत असल्याचे म्हणत घाटकोपरमध्ये दहीहंडी निश्चित साजरी होणार असे जाहीर केले आहे. जर बिअर बार सुरू करण्यासाठी नियम लावता तर मंदिरं उघडण्यासाठी का नाही असा सवाल राम कदम यांनी ठाकरे सरकारला विचारला आहे.
Continues below advertisement
Tags :
CM Uddhav Thackeray Mumbai Latest Marathi News Abp Majha Mumbai News Uddhav Thackeray Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Ram Kadam ABP Majha ABP Majha Video Dahi Handi 2021 Dhahi Handi