
Rajkiya Shole on Raj Thackeray | मनपा निवडणुकीत मनसे आणि भाजप एकत्रित नाष्टा करणार का?
राजकीय नेते भेटल्यावर राजकीय चर्चा होणे स्वाभाविक आहे- प्रसाद लाड.
दरम्यान, या भेटीनंतर राजकीय वर्तुळातून आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे. यावर बोलतांना भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी आपली प्रतिक्रिया देत ही भेट मैत्रीपूर्ण भेट असल्याची माहिती दिली आहे. राजकीय नेते भेटल्यावर राजकीय चर्चा स्वाभाविक होणारच, यात दुमत नाही,असेही प्रसाद लाड म्हणाले.
राज ठाकरेंनी शिवाजी पार्कमध्ये एक कॅफे उघडलाय- संजय राऊत
राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे एक कॅफे उघडला होता एवढेच मला माहिती आहे. तिथे काही लोक सातत्याने चहापाण्यासाठी जात असतात आणि तो सर्वासाठी खुला आहे. किंबहुना राजकारणातली ही चांगली गोष्ट असून असे चहापान होत असतात. चांगला कॅफे असला तर लोक जात येत असतात त्यांना चांगला नजारा बघायला मिळतो, बसायला उत्तम जागा मिळते, असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीवरून संजय राऊत यांनी भाष्य करत ही टीका केली आहे.