Rajasthan Chief Minister Ashok Gehlot काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरणार : ABP Majha

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरणार आहेत.. त्यामुळे राजस्थानमध्ये नेतृत्व बदलाच्या घडामोडींना वेग आलाय.. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा उत्तराधिकारी आज ठरण्याची शक्यता आहे... आज संध्याकाळी सात वाजता राजस्थानच्या जयपूरमध्ये काँग्रेस विधिमंडळ दलाची बैठक होणार आहे. या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि अजय माकन उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत राजस्थानचा पुढील मुख्यमंत्री कोण हे ठरण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रिपदासाठी सचिन पायलट यांना संधी मिळणार का? की गहलोत आपल्या मर्जीतला मुख्यमंत्री नेमून धक्का देणार का याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय...  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola