Raj Thackeray Nashik : Maratha Reservation म्हणजे तोंडाला पानं पुसण्याचं काम, सरकारने जागृक राहावं
मराठा आरक्षणासंदर्भातील (Maratha Reservation) विधेयक विधीमंडळात एकमतानं मंजूर झालं. यासंदर्भात मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षणाचं विधेयक मंजूर झालं याचा आनंद आहे. मात्र, याचा कितपत फायदा होईल, याचा विचार मराठा समाजानं (Maratha Samaj) करावा, मराठा समाजानं जागरूक राहावं, कारण सरकारचं तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू आहे, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, "मराठा आरक्षणाचं विधेयक मंजूर झालं याचा आनंद आहे. मात्र, मराठा समाजानं जागरूक राहावं, सरकारकडून तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू आहे. तुम्हाला आठवत असेल, तर तामिळनाडूत राज्य सरकारनं अशा प्रकराचं आरक्षण दिलं आणि आता ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. त्याचं पुढे काहीच झालं नाही, राज्य सरकारला मुळात असे अधिकार आहेत का? ही गोष्ट आहे केंद्राची, सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या निर्णयाची. मी मागेही सांगितलं होतं की, हा विषय टेक्निकल विषय आहे, उगाच सरकारनं जाहीर केलं म्हणून आनंद मानण्यासारखं नाही."