Raj Thackeray : 'निवडणुकीच्या कामाला लागा' मनसे पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंचे आदेश

मुंबईसह राज्यातल्या विविध महापालिकांच्या निवडणुका मार्च महिन्यात लागण्याची शक्यता आहे. त्यामुळं त्यादृष्टीनं कामाला लागा, असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. राज ठाकरे यांनी बोलावलेली मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईतल्या वांद्रे पूर्व येथील एमआयजी क्लबवर पार पडली. या बैठकीत सिनेट निवडणुकीच्या निमित्तानं पदवीधर मतदारांच्या अधिकाधिक नोंदणीचीही सूचना राज ठाकरे यांनी केली. सिनेट निवडणुकीच्या निमित्तानं राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसे पहिल्यांदाच पूर्ण ताकदीनं मैदानात उतरणार आहे. त्यामुळं मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत यंदा अभाविप आणि युवा सेनेच्या बरोबरीनं मनसेच्या कामगिरीवरही राजकीय निरीक्षकांचं लक्ष राहिल. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola