
Raj Thackeray on MNS | पक्ष बांधणीसाठी मनसेची नवी यंत्रणा, अमित ठाकरेंकडे शाखा अध्यक्षांची जबाबदारी
Raj Thackeray on MNS | पक्ष बांधणीसाठी मनसेची नवी यंत्रणा, अमित ठाकरेंकडे शाखा अध्यक्षांची जबाबदारी, पाहा व्हिडिओ
राज ठाकरे यांनी आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षला बळकटी देण्यासाठी नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या मुंबई शहराध्यक्षपदाची जबाबदारी संदीप देशपांडे यांच्यावर देण्यात आली आहे. तर बाळा नांदगावकर यांच्यावर गट अध्यक्षांच्या कामाची जबाबदारी देण्यात आली. तर राज ठाकरे यांचे अमित ठाकरे यांच्यावर मनसेच्या शाखा अध्यक्षांच्या कामाचा आढावा घेण्याची जबाबदारी देण्यात आल्याचे समजते.
विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षसंघटनेत मोठे फेरबदल करण्याचे संकेत दिले होते. पक्षात कोणती पदे असतील, त्याची पुनर्रचना कशी असेल, पदाधिकाऱ्यांच्या आचारसंहितेत कोणते मुद्दे असावेत, याचा अभ्यास करून मागील काही दिवसांपासून राज ठाकरे हे स्वत: याबाबतचा आराखडा तयार करत होते.
हे देखील वाचा
Sanjay Raut on Narayan Rane : ...तेव्हा राणेंच्या कुटुंबीयांनीच उद्धव ठाकरेंना फोन केला होता; नारायण राणेंच्या दाव्याची राऊतांकडून चिरफाड
Sanjay Raut on Narayan Rane : दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंचे (Aaditya Thackeray) नाव घेऊ नका, अशी विनंती करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मला दोन फोन केल्याचा दावा भाजपचे माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केला. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार पलटवार केलाय. उद्धव ठाकरेंनी असा कोणताही फोन केला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. उलट नारायण राणे यांना अटक केल्यानंतर त्यांच्या कुटुंबाकडून उद्धव ठाकरेंना फोन आल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केलाय.
संजय राऊत म्हणाले की, माझी या विषयावर उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली, असे काही घडले, याचा पूर्णपणे त्यांनी इन्कार केला. कोणताही फोन यासंदर्भात नारायण राणे यांना झाला नाही आणि हे संभाषण झाले नाही, असे त्यांनी म्हटले. मिलिंद नार्वेकर यांच्याशी देखील माझे बोलणं झालं. अशा प्रकारचे कोणतेही संभाषण झालेले मला दिसत नाही आणि झालेच नाही. नारायण राणे कशाच्या आधारावर असे प्रकारचे वक्तव्य करत आहेत हे समजून घेणे गरजेचे आहे. त्यांची प्रकृती बरी नाही का? त्यांनी सत्तरी पार केली आहे आणि आम्हाला त्यांच्या प्रकृतीची चिंता वाटते.