Raj Thackeray On Abdul Sattar :सुप्रिया सुळेंवरील वक्तव्यावरुन अब्दुल सत्तारांना राज ठाकरेंनी झाडलं
नेस्को सेंटरमधील सभेत आज मनसेप्रमुख राज ठाकरेंची तोफ चांगलीच धडाडली. आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने मनसेचं काम आणि आंदोलन लोकापर्यंत पोहोचवण्याचं आवाहन राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केलंय. सोबतच राज ठाकरेंनी आज उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. एकनाथ शिंदेंनी रात्री कांडी फिरवल्यानंतर उद्धव ठाकरे घराबाहेर पडल्याचा टोला राज ठाकरेंनी लगावला. शिवाय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं शिवरायांविरोधातील विधान आणि राहुल गांधींच्या सावरकरांविरोधातील वक्तव्यावरून सुरू झालेल्या वादावर राज ठाकरेंनी चांगलंच सुनावलंय. गांधी-नेहरूंच्या बदनामीचं कारस्थान थांबवण्याचा सल्ला यावेळी राज ठाकरेंनी भाजपला दिला. तर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्त्व्यावरून राज ठाकरेंनी तीव्र संताप व्यक्त केला.
Tags :
Raj Thackeray Speech MNS Raj Thackeray Latest News Maharashtra Politics Raj Thackeray News Raj Thackeray Nesco Sabha Raj Thackeray Gat Adhyaksh Melava Raj Thackeray Nesco Speech