Raj Thackeray Nagpur Daura : MNS च्या इंजिनला भाजपचा डबा? राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य

राज ठाकरे यांनी त्यांच्या आगामी विदर्भ दौऱ्यापूर्वी एक सूचक भाष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे १७ सप्टेंबरपासून राज ठाकरे हे विदर्भाच्या दौऱ्याला प्रारंभ करणार आहेत. नागपूर, चंद्रपूर आणि अमरावतीला जाऊन राज ठाकरे चाचपणी करणार आहेत. या दौऱ्यावर जाण्यापूर्वी राज ठाकरे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना एक अत्यंत सूचक वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांना पत्रकारांनी 'तुम्ही रेल्वेने नागपूरला का जात आहात का, असा प्रश्न विचारला. त्यावर राज ठाकरे यांनी म्हटले की, सध्या काही डबे जोडण्याचं काम सुरु आहे. त्यामुळे मी रेल्वेनेच नागपूरला जातोय. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola