Raj Thackeray Meets Jaysingrao Pawar : कोल्हापूर दौऱ्यावर राज ठाकरेंनी घेतली जयसिंगराव पवारांची भेट
Dr Jaysingrao Pawar on Raj Thackeray : राज ठाकरेंनी एकच सल्ला, कुठलीही उपक्रम मध्येच सोडू नका
डॉ जयसिंगराव पवार हे ज्येष्ठ इतिहास संशोधक असून त्यांनी महाराणी ताराबाई, सेनापती संताजी घोरपडे, मराठेशाहीचा मागोवा, राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ इत्यादी एकूण २५पेक्षा अधिक इतिहासविषयक ग्रंथ लिहिले. निरनिराळ्या इतिहास परिषदांमध्ये तसेच संशोधनपर नियतकालिकांत त्यांचे ४५हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले. त्यांनी अनेक इतिहास परिषदांचे अध्यक्षस्थान भूषविले. अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे ते संस्थापक - सदस्य आणि नंतर तीन वर्षांसाठी अध्यक्ष होते. त्यांनी १९९२ मध्ये महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे संस्थापक-संचालक म्हणूनही ते कार्यरत होते. इतिहास संशोधन व त्याद्वारा समाजप्रबोधन हे त्यांचे उद्दिष्ट असून, त्यानुसार संस्थेतर्फे १२०० पानांचा, तीन खंडांचा राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ २००१मध्ये प्रसिद्ध केला.
मात्र या सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा की जयसिंगराव पवार यांनी बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिलेल्या इतिहासाला कायमच विरोध केलाय.
या पार्श्वभुमीवर राज ठाकरे यांनी जयसिंगराव पवारांची घेतलेली भेट महत्वाची ठरते.