Raj Thackeray : Nitin Gadkari आणि राज ठाकरेंमध्ये 2 तास चर्चा, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी काल रात्री राज ठाकरेंची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतलीय. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास गडकरी राज ठाकरेंच्या घरी दाखल झाले होते... या नेत्यांमध्ये सुमारे सुमारे २ तास चर्चा झाली...गुढीपाडव्याच्या भाषणात राज ठाकरेंनी महाविकास आघाडीवर शरसंधान साधलं होतं..पण त्याचवेळी भाजपला सॉफ्ट कॉर्नर देऊन यूपीच्या विकासाचं कौतुक केलं होतं, त्यामुळं गडकरी आणि राज ठाकरे यांच्या कालच्या भेटीला विशेष महत्व प्राप्त झालंय. गडकरी आणि राज ठाकरे यांच्या कालच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.