Raj Thackeray Meet Amit Shah : राज ठाकरे आणि अमित शाहांमध्ये अर्धातास बैठक : ABP Majha
राज ठाकरेंची अमित शाह यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मिळतेय... दिल्लीतील अमित शाहांच्या निवासस्थानी राज ठाकरे आणि अमित शाहांमध्ये अर्धातास बैठक पार पडली. .या बैठीकीनंतर मनसे महायुतीतला नवा घटक पक्ष बनण्याची शक्यता आहे.. काही दिवसांपूर्वीच मनसे महायुतीमध्ये सामिल होणार आणि मनसेला १-२ जागा मिळतील अशी बातमी एबीपी माझाने प्रसारित केली होती या बातमीवर आता जवळपास शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.. राज ठाकरे आणि अमित शाहांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय..