Rahul Shewale : राष्ट्रपतींना भेटून अभिनंदन केलं, आदिवासी बांधवांच्या समस्येबाबत चर्चा केली
शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. भेटीदरम्यान राहुल शेवाळे यांनी आदिवासी बांधवांच्या समस्यांबाबतही राष्ट्रपतींसोबत बातचीत केली. पाठिंबा दिल्याबद्दल राष्ट्रपतींनी आभार मानले आणि माझ्या पत्राबाबतही दखल घेतल्याचे राहुल शेवाळे म्हणाले.