Rahul Shewale यांनी मानहानी याचिका दाखल, Uddhav Thackeray आणि Sanjay Raut उपस्थित राहणार?
शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी दाखल केलेल्या मानहानी याचिकेवर आज माझगाव कोर्टात सुनावणी आहे. 'सामना' या ठाकरे गटाच्या मुखपत्रात शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्या विरोधात बदनामीकारक मजकूर प्रकाशित केल्याचं हे प्रकरण आहे. या प्रकरणी मुंबई न्यायदंडाधिकारी न्यायालयानं उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना दुसऱ्यांदा समन्स बजावलंय आणि दोघेही हजर राहणार असल्याची माहिती मिळतेय.