कोरोना संकटातून महाराष्ट्राला बाहेर काढण्यासाठी आम्ही सरकारसोबत, राहुल गांधींचा मुख्यमंत्र्यांना फोन

 कोरोना संकटातून महाराष्ट्राला बाहेर काढण्यासाठी काँग्रेस पूर्णपणे सोबत असल्याची ग्वाही काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली. राहुल गांधी आणि मुख्यमंत्री यांच्यात काल (27 मे) फोनवरुन चर्चा झाल्याचं कळतं. यावेळी सरकारसोबत असल्याचं आश्वासन राहुल गांधी यांनी मुख्यंत्र्यांना दिलं.
"महाराष्ट्रात काँग्रेसचा सरकारला पाठिंबा आणि पण आम्ही मुख्य निर्णयकर्ते नाही," असं वक्तव्य राहुल गांधी यांनी काल केलं होतं. त्यानंतर महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चा रंगली होती. त्याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवरुन संवाद साधून सगळं काही आलबेल असल्याचं अधोरिखित करण्याचा प्रयत्न केला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola