Rahul Gandhi Bail | राहुल गांधींना जामीन मंजूर, 20 हजारांच्या जातमुचलक्यावर 5 मिनिटांत जामीन
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना लखनौ न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. राहुल गांधी न्यायालयात हजर झाल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत न्यायालयाने त्यांना जामीन दिला. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी आलोक वर्मा यांनी राहुल गांधी यांना वीस हजारांच्या दोन जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. भारतीय सैन्यावरील त्यांच्या टिप्पणीसाठी त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. गेल्या पाच सुनावण्यांमध्ये राहुल गांधी उपस्थित राहिले नव्हते, त्यामुळे न्यायालयाने त्यांना समन्स बजावले होते. या समन्सनंतर आता न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात राहुल गांधींना मोठा दिलासा मिळाला असून, न्यायालयाच्या या निर्णयामुळे पुढील कायदेशीर प्रक्रियेला गती मिळेल. या प्रकरणाची पुढील सुनावणी कधी होईल, याबाबत अद्याप माहिती नाही, परंतु जामीन मिळाल्याने तात्पुरता दिलासा मिळाला आहे.