सतराहून अधिक विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत Rahul Gandhi यांची 'चाय पे चर्चा' ABPMajha
#Rahulgandhi #Monsoonsession #Abpmajha
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज 14 प्रमुख विरोधी पक्षांना आज सकाळी ब्रेकफास्ट साठी आमंत्रित केलं आहे. या 'ब्रेकफास्ट डिप्लोमसी' च्या माध्यमातून राहुल गांधी आज 100 हून अधिक खासदारांशी चर्चा करणार असून त्यामध्ये केंद्र सरकारला संसदेत घेरण्याची तयारी सुरु आहे. राहुल गांधींच्या या 'ब्रेकफास्ट डिप्लोमसी' चे आयोजन संसदेतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये आयोजित करण्यात आलं असून त्यानंतर विरोधी पक्षांची बैठक होणार आहे.
शेतकरी आंदोलन आणि पेगॅसस प्रकरणी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. या मुद्द्यावरुन केंद्र सरकारने संसदेत चर्चा करावी अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. पेगॅसस स्पायवेअर प्रकरणी देशातील 40 पत्रकार, विरोधी पक्ष नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर पाळत ठेवल्याचा दावा फ्रान्सच्या एका माध्यमाने केला आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात यावा अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे.