Pune MNS Foundation Day : मनसैनिकांनो, फक्त लढायचं नाही तर जिंकायचंच! : Bala Nandgaonkar

MNS Foundation Day : आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन आहे. आज मनसेची स्थापना होऊन 16 वर्ष पूर्ण झाली आहेत. 2006 ला राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती. दरम्यान, यावेळी होणारा वर्धापन दिनाचा मेळावा विशेष असणार आहे. याचं कारण म्हणजे दरवर्षी मनसेचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम हा मुंबईत होत असतो. मात्र, यावेळी होणारा कार्यक्रम हा पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच याठिकाणी होत आहे. त्यामुळे पुण्यात होणाऱ्या या मेळाव्यात राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडं सर्वांचे लक्ष लागलं आहे. दरम्यान, पुढच्या काही दिवसात महानगर पालिका निवडणुका होणार आहेत. त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण, सर्वच पक्षांनी पालिकेच्या निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आदेश देणार का? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola