Pune Metro I पुण्यातील बहुप्रतिक्षित मेट्रो प्रगतीपथावर I एबीपी माझा
पुण्यातील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित मेट्रो प्रगतीपथावर आहे. जमिनीवरील मेट्रोचे काम सुरु असताना आता भुयारी मेट्रोच्या कामालाही सुरुवात झालीय. कृषि महाविद्यालयाच्या मैदानात टनेल बोरिंग मशीनच्या मदतीने भुयारी मार्ग तयार केला जातोय. शिवाजीनगर ते स्वारगेट असा पाच किलोमीटरवर हा मार्ग बनवला जातो. ये-जा करण्यासाठी दोन स्वतंत्र मार्गिका असून एकुण लांबी 10 किलोमीटर आहे. या दरम्यान पाच मेट्रो स्थानक निर्माण करण्यात येणार आहे. जमिनीच्या पोटात साधारण शंभर फुटापर्यंत खोदकाम केलं जाणार आहे. त्याचबरोबर आतून सिमेंट काँक्रिटीकरणही सुरू राहणार आहे.