Priyanka Gandhi | लखनौ पोलिसांनी गळा दाबून धक्काबुक्की केली : प्रियंका गांधी | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Dec 2019 09:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
लखनौ पोलिसांनी गळा दाबत धक्काबुक्की केल्याचा गंभीर आणि खळबळजनक आरोप काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधींनी केलाय. प्रियंका सध्या उत्तर प्रदेशची राजधानी लखनौच्या 2 दिवसीय दौऱ्यावर आहे. नागरिकत्त्व कायद्याविरोधात आंदोलन करणारे आयपीएस अधिकारी दारापुरी आणि काँग्रेसचे प्रवक्ते जफर यांना पोलिसांनी अटक केलीय. त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी प्रियंका गांधी निघाल्या होत्या. मात्र पोलिसांनी वाटेत अडवल आणि गळा दाबत धक्काबुक्की केल्याचा आरोप प्रियंका गांधींनी केलाय. दरम्यान पोलिसांच्या विरोधानंतर स्कुटीवरुन प्रवास करावा लागल्याचा दावा प्रियंका गांधींनी केलाय.