Prithviraj Chavan Reaction : Tweet लाईकवरुन चव्हाणांचं स्पष्टीकरण- नक्की काय झालंय ते मी तपासतोय!
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी, भाजप नेते मोहित कंबोज यांनी पोस्ट केलेल्या फडणवीसांच्या व्हीडियोला केलं लाईक. राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात.या बातमीवर पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्टीकरण दिलं आहे. नक्की काय झालय ते मी तपासून बघतोय. इतक्या वर्षात मी कधीही असं काही केलं नाही, मला जर असं करायचं असतं तर मी खुल्या मंचावरुन केलं असतं, माझी भूमिका मांडण्यासाठी मी एखाद्या ट्विटला लाईक का करेन, अशी भूमिका पृथ्वीराज चव्हाणांनी मांडली आहे. ट्विटरच्या कव्हर फोटोवरून काँग्रेसचं चिन्ह काढलं का, असाही प्रश्न पृथ्वीराज चव्हाणांना विचारण्यात येतोय.. त्यावरही त्यांनी उत्तर दिलंय. माझ्या कव्हर फोटोमध्ये काँग्रेसचं चिन्ह कधीच नव्हतं.. आणि कुणी असा दावा करत असेल तर ते कधी होतं हे त्यांनी दाखवावं, असंही चव्हाण म्हणाले.
Tags :
Video Post Explanation Prithviraj Chavan Fadnavis Role Mohit Kamboj BJP Leader Political Circle Senior Leader CONGRESS Like