Presidents Rune | महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट? | ABP Majha
Continues below advertisement
काल दिवसभरातल्या नाट्यमय राजकीय घडामोडी पाहिल्यानंतर महत्त्वाचा उपस्थित झालेला सवाल म्हणजे, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार का? भाजपनं सत्तास्थापनेचा दावा करणार नसल्याचं जाहीर केल्यानंतर, शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याच्या आशेवर राजभवन गाठलं खरं.. मात्र ऐनवेळी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्याचं पत्र राजभवनावर पोहोचलं नाही. त्यामुळं शिवसेनेनं सत्तास्थापनेचा दावा केला असला तरी तो फोल ठरण्याचीच दाट शक्यता आहे.. लगेचच राज्यपालांनी 24 तासांची मुदत देत, तिसरा मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादीला सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी निमंत्रण दिलं. हे निमंत्रण नेमकं कशाला दिलं असा सवाल उपस्थित करत अजित पवारांसह राष्ट्रवादीचे अनेक नेते राजभवनावर दाखल झाले.. फक्त काँग्रेसच्या पाठिंब्यासह राष्ट्रवादीला सत्तास्थापन करणं शक्य नसल्यानं महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची दाट शक्यता आहे
Continues below advertisement