Presidents Rule | राष्ट्रपती राजवटीचा शेतकऱ्यांना फटका, सरकार नसल्याने शेतकरी मदतीपासून वंचित | ABP Majha

Continues below advertisement
राष्ट्रपती राजवटीचा फटका रुग्णांनंतर आता शेतकऱ्यांनाही बसणार आहे. अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना फडणवीस सरकारनं १० हजार कोटींची मदत देण्याचा निर्णय तत्कालीन फडणवीस सरकारनं घेतला. पण त्याची पुरवण्यांमध्ये तरतूद झाली नसल्यामुळे ही मदत रखडली आहे. राज्यातील 9 लाख शेतकऱ्यांच्या सुमारे 90 लाख हेक्टरवरच्या पिकांना अवकाळीचा फटका बसला आहे. तर, राष्ट्रपती राजवटीमुळे नुकसान भरपाईच्या निधीसाठी राज्यपालांना संसदेची मंजुरी घ्यावी लागेल आणि त्यामुळे आता केंद्र सरकारच राज्यातल्या शेतकऱ्यांना पुढच्या दोन दिवसांमध्ये काही मदत घोषित करण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram