Prashant Bamb | प्रशांत बंब यांनी नुसता खटाटोप करू नये : खासदार चिखलीकर | ABP Majha
आमदार बंब यांनी नांदेड जिल्ह्यातील पेनुर-शेवडी-सोनखेड या रस्त्याच्या कामाची तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेतली गेली नसल्याने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. यानंतर गुन्हा दाखल करण्याचे आदेश खंडपीठाने दिले होते. दरम्यान संतापलेल्या चिखलीकर यांनी बंब हेच ब्लॅकमेलर आहेत, त्यांच्या पत्राची दखल घेऊ नका असं म्हटलंय. बंब तक्रार करुन ठेकेदारासोबत तडजोड करतात असा आरोप चिखलीकरांनी केला आहे.
Tags :
Prashant Bamb Prataprao Chikhalikar Hurdles In Road Projects Marathwada Leaders Nitin Gadkari Blaim Road Projects