महाविकास आघाडीच्या नदी लागू नका, उद्धव ठाकरेंना सल्ला, प्रकाश आंबेडकर यांचं भाषण
प्रकाश आंबेडकर यांचं भांडुपमधील भाषण.
शिवसेनेला सांगतो महाविकास आघाडी च्या नदी लागू नका. सुप्रीम कोर्टाने हिंमत दाखवली नाही. हे सरकार गैर आहे हे सांगितले. पण म्हंटले शिंदे तुम्ही चालू ठेवा. आम्हाला असे अपेक्षित होते हे सरकार बरखास्त करा. पण सर्व बरबटले आहेत. निर्णय नंतर शिंदे भेटले पेढे द्या म्हणाले दुधात अंघोळ घालतो मी म्हणालो सुप्रीम कोर्टच्या जजला घाला. आता रिक्षावाला मुख्यमंत्री झाला त्याचा आनंद आहे, शिंदे म्हणाले ही घटना आहे म्हणून झालो.
मी म्हणालो तुमचे मित्र त्यांचे काय ते म्हणाले अवघड दुखणे असते सहन क्रायचे, मी म्हणालो पडा बाहेर परत एकत्र येऊ. या पुढे ज्याला सत्तेत जायचे आहे त्याला वंचितला सोबत घेतल्याशिवाय सत्ता येत नाही. आणि जेवढे ईडीच्या खाली आहे ते ही मित्र आहेत त्यानं ही शिकवत असतो. त्यांना म्हंटलो सहा महिने काढा भाजप ला झोपवून टाकू. ज्यांच्या मानगुटीवर तलवार आहे ते किती सहन करतात बघू तर भाजपला लोकसभेत झोपवतो आपण.
निवडणूक कधी होईल वर्ष भर चर्चा आहे. पावसामुळे चार महिने पुढे जातील अशी स्थिती आहे. आपल्या समोर राजकीय परिस्थिती आहे, विचित्र राजकीय स्थिती आहे. कटपुतळी आपण पाहिली आहे तिला नाचवणारा एक जण असतो या देशात दोन जण आहे एक नरेंद्र मोदी दुसरे अमित शहा.
अमित शहा मोठे विधान करुन गेले, की महाराष्ट्रमध्ये ४८ जागा जिंकू. त्यांना लक्षात आले होते कर्नाटक जिंकू शकणार नाही. बदल झालेला दिसला
लोकांमध्ये बदलाचा सुर झालं की बदल होतो.
काँग्रेस च नाना पाटोळे एकटे असले की एकटा लढणार म्हणतात. महाविकास आघाडी मध्ये बैठकीत आले की सर्वांबरोबर लढवणार सांगतो
या दोन मदाऱ्यांना खेळ करायचा आहे. जयंत पाटील यांची सहा तास चौकशी झाली. प्रश्न काय होते विचारायला पाहिजे. हे मदारी बापात बाप ठेवणार नाहीत
इलेक्शन ला वेळ आहे, या मदाऱ्यानो खुश करण्याचे काम काज सुरू केले. एकदिवस कानात सांगितलं जाईल येतो की तिहार जेल.
ज्यांच्यावर ईडी लागली आहे ते अनेक जण भाजप मध्ये सहभागी झाली तर आश्चर्य वाटू नका. महानगर पालिका अहवालात राजकारण दडले आहे