Prakash Ambedkar on Sanjay Raut : भाजपसोबत न जाण्याचं आश्वासन देण्यास राऊतांचा नकार
Continues below advertisement
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एबीपी माझावर अतिशय मोठा गौप्यस्फोट केला आहे. महाविकास आघाडीसोबत चर्चा सुरू असताना, पाच वर्षं भाजपसोबत न जाण्याचं आश्वासन देण्यास संजय राऊतांनी नकार दिला, आणि त्यामुळेच आमची चर्चा फिसकटली, असं आंबेडकर म्हणाले. एबीपी माझाच्या तोंडी परीक्षा या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.
Continues below advertisement