Prakash Ambedkar : नाना पटोले आणि भाजपचा छुपा संबंध प्रकाश आंबेडकरांची गंभीर टीका
Continues below advertisement
Prakash Ambedkar on Nana Patole, Akola : "नाना पटोलेंच्या आयुष्यातील दुर्दैवाचा दिवस आहे, असं मी मानतो. आम्ही सात जागांवर काँग्रेसला पाठिंबा दिला. त्यानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने दोन जागांवर पाठिंबा द्या, असं कळवलं. त्यानंतर कोल्हापूर आणि नागपूरच्या जागेवर आम्ही पाठिंबा जाहीर केला. आमच्या पाठिंबामुळे कोण विजय होणार आणि कोण पराभूत होणार हा भाग वेगळा आहे. मात्र,नाना पटोलेंनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये काँग्रेस उमेदवार विजयी होणार म्हणून त्यांना प्रचंड दु:ख झालं", असं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले. अकोला येथे प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.
Continues below advertisement