Prakash Ambedkar Meet Sharad Pawar : प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांची भेट घेतल्याची चर्चा
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी काल रात्री शरद पवारांची भेट घेतल्याची चर्चा सुरू आहे... पुण्यातील मोदी बागेत दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळतेय...मात्र प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांसोबत भेट झालीच नसल्याचा दावा केलाय.. बहिणीची भेट घेण्यासाठी मोदी बागेत आलो होतो असं स्पष्टीकरण प्रकाश आंबेडकरांनी दिलंय.. प्रकाश आंबेडकर हे इंडिया आघाडीत जाण्यास इच्छुक आहेत... आणि शरद पवारांनींही याला सकारात्मक प्रतिसाद दिला होता.