Prakash Ambedkar Ahemendnagar Rally : प्रकाश आंबेडकरांची आज नगरमध्ये जाहीर सभा ABP Majha
अहमदनगरमध्ये आज वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची अहमदनगर येथे जाहीर सभा होणार आहे.. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दिलीप खेडकर यांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकरांची सभा होतेय. एन.आर लॉन या ठिकाणी प्रकाश आंबेडकरांची सभा होतेय. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ऐन वेळेस उमेदवार बदलल्याने वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते या भूमिकेवर नाराज आहेत... त्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर अहमदनगरमध्ये येणारा असून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची समजूत ते काढू शकतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.