Prabhadevi Shivsena Rada : शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत दादर पोलीस ठाण्यात दाखल

Continues below advertisement

विसर्जनावेळी शिवसेना आणि शिंदे गटात झालेल्या राड्याची पोस्ट शिंदे गटातल्या संतोष तेलवणे यांनी फेसबुक आणि व्हॉट्सअपवर टाकल्यामुळे काल रात्री प्रभादेवीत पुन्हा दोन्ही गटांमध्ये राडा झाला.. यावेळी  सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप ठाकरे गटाने केलाय.  दरम्यान सदा सरवणकर यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. याप्रकरणी दादर पोलिसांनी दोन्ही गटातील काही लोकांना ताब्यात घेतलंय... तर गर्दीवर नियंत्रण मिळण्यासाठी मध्यरात्री पोलिसांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्जही केला.. दरम्यान शिंदे आणि ठाकरे गटातल्या राड्यानंतर आता शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत दादर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.. शिवसैनिकांना अटक का केली याचा जाब त्यांनी विचारला.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram