Sanjay Rathod | स्पेशल रिपोर्ट | पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी वनमंत्री संजय राठोड भूमिका स्पष्ट करणार?
Continues below advertisement
पोहरादेवी येथे धर्मपीठावर महंतांची बैठक पार पडली. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्या अडचणींमध्ये वाढ होताचानाचं चित्र दिसत असतानाच आता अखेर अनेक आरोप –प्रत्यारोपांच्या सत्रांमध्ये जवळपास 12 दिवसांपासून नॉट रीचेबल असणारे राज्याचे वनमंत्री संजय राठोड हे सहपरिवार 23 फेब्रुवारीला पोहरादेवी येथे धर्मपीठावर येणार आहेत. या संदर्भातील माहिती महंत जितेंद्र महाराज आणि सुनील महाराज यांनी शनिवरी माध्यमांशी बोलताना दिली.
दोन दिवसांपूर्वी आपण याच ठिकाणी इतरही महंतांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. या बैठकीत संजय राठोड यांनी पोहरादेवीत संतांच्या दर्शनासाठी येत पुन्हा एकदा त्यांनी आपल्या कामाची सुरुवात करावी अशी विनंतीही राठोडांना करण्यात आली. खेर सांगितल्याप्रमाणं संजय राठोड यांच्या कार्यालयाकडून त्यांच्या भेटीची अधिकृत तारीख मिळाल्याचं महंतांकडून सांगण्यात आलं.
23 फेब्रुवारीला मंगळवारी, सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास संजय राठोड हे इथं संपूर्ण कुटुंबासमवेत येणार असल्याची माहिती त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली. इथं विधीवत पूजा संपन्न झाल्यानंतर आणि संतांचं दर्शन झाल्यानंतर धर्मपीठाला भेट दिल्यानंतर ते या ठिकाणहून निघतील असंही सांगण्यात आलं आहे. तेव्हा आता या ठिकाणी राठोड माध्यमांशी संवाद साधण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. असं झाल्यास ते नेमकं काय बोलणार याकडेच साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.