Maharashtra politics : खेडच्या सभेवरुन खडाखडी, बरसली महाविकास आघाडी
Continues below advertisement
दापोलीतील साई रिसॉर्टप्रकरणी ईडीनं मोठी कारवाई केलेय..रामदास कदम यांचे बंधू आणि अनिल परब यांचे बिझनेस पार्टनर सदानंद कदम यांना ईडीनं चार तासांच्या चौकशीनंतर अटक केलीय...साई रिसॉर्टची मालकी सदानंद कदम यांच्याकडे आहे... सदानंद कदम हे शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांचे सख्खे लहान भाऊ आहेत... खेड मधील कुडोशी येथील त्यांच्या अनिकेत फार्म हाऊस या निवसस्थानातून सदानंद कदम यांना इडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं होतं. आता त्यांना अटक करण्यात आलीय... दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी खेडमध्ये सभा घेऊन भाजप आणि शिंदेंवर तोफ डागल्याने ही कारवाई केल्याचा आरोप ठाकरे गटाने केलाय. उद्धव ठाकरेंची खेडमधली सभा सत्ताधाऱ्यांना झोंबली, त्यामुळे त्यांनी कदमांवर कारवाई करून वचपा काढल्याची तोफ ठाकरे गटाने डागलीय.
Continues below advertisement