PM Narendra Modi Nagpur Reshim Bagh : पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरातील रेशीम बागेत, डॉ. हेडगेवार यांच्या स्मृतीला केलं अभिवादन

Continues below advertisement
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आज गुढीपाडव्याला नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शहरातील माधव नेत्रालयमधील नव्या इमारतीच्या भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. त्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी नागपुरातील रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन (Dr. Hedgewar Smarak) परिसरात भेट देऊन येथील स्मृति मंदिराला नमन केलं आहे.
 
यावेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत संघ मुख्यालयातून रेशीमबागेतील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात पोहोचले होते. सोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससह इतर नेते देखील प्रामुख्याने उपस्थित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर आगमनापूर्वीच संघ प्रमुख मोहन भागवत रेशीमबागेत दाखल झाले होते..
त्यामुळे एक स्वयंसेवक राहिलेले, प्रचारक राहिलेले, मात्र सध्या देशाच्या सर्वोच्च प्रशासकीय पदी असलेले नरेंद्र मोदी जेव्हा संघाच्या कार्यालयात येत आहेत. तेव्हा सरसंघचालक मोहन भागवत ही तिथे उपस्थित आहेत.
संघाच्या परंपरेनुसार येणाऱ्या पाहुण्यांचा स्वागत स्थानिक पदाधिकारी करतात. त्या नात्याने आज हेडगेवार स्मारक समितीचे अध्यक्ष म्हणून भैय्याजी जोशी पंतप्रधानांचा स्वागत केलं आहे.
 
मात्र जेव्हा संघाचा आजवरचा सर्वात यशस्वी स्वयंसेवक म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी संघात येत आहे, तेव्हा सरसंघचालक तिथे उपस्थित राहतात याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
 
यावेळी संघाकडून मोहन भागवत, भैय्याजी जोशी हे तर होतेच सोबतच संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे काही पदाधिकारी ही उपस्थित होते.
 
भाजपचं सर्वोच्च नेतृत्व जेव्हा संघस्थानी पोहोचत आहे, तेव्हा ते संघ आणि भाजप यांच्या संबंधांसाठी महत्त्वपूर्ण दिवस तर आहेच. सोबतच देशाच्या राजकारण आणि समाजकारणावर ही या पंधरा मिनिटांच्या भेटीचे अनेकविध परिणाम येणाऱ्या दिवसात होणार आहे.
 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola