PM Modi On Thackeray Group Yuti:युती ठाकरेंनी तोडली,भाजपनं नव्हे;NDAखासदारांच्या बैठकीत विधान
बातमी पंतप्रधान मोदींच्या एका वक्तव्याची. महाराष्ट्रातील युती ठाकरेंनी तोडली, भाजपनं नव्हे असं पंतप्रधान मोदी एनडीए खासदारांच्या बैठकीत म्हणाले. एनडीएमधून बाहेर पडलेल्या पक्षांचा देखील त्यांनी दाखला दिला. यापुढे देखील आपल्याला एनडीए म्हणून काम करायचं आहे, काँग्रेसप्रमाणे भाजप अहंकारी नाही, त्यामुळे भाजप सत्तेवरून पायउतार होणार नाही, असंही मोदी म्हणाल्याचं कळतंय. नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात मंगळवारी संध्याकाळी एनडीएच्या खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीला पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. अजित पवार गटाचे खासदारही बैठकीसाठी हजर होते.