PM Narendra Modi : 60 वर्षात काँग्रेसने खड्डेच खड्डे खोदून ठेवले, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

PM Narendra Modi : 60 वर्षात काँग्रेसने खड्डेच खड्डे खोदून ठेवले, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

लोकसभेनंतर राज्यसभेतही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर विरोधकांना उत्तरं दिली. भाषणाची सुरुवातच विरोधकांच्या घोषणाबाजीनं झाली. 'मोदी-अदानी भाई भाई' अशी घोषणाबाजी राज्यसभेत विरोधकांनी केली. विरोधकांचा गोंधळ सुरु असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं भाषण सुरुच ठेवलं. यावेळी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांच्यावरही निशाणा साधला. त्याशिवाय काँग्रेस आणि भाजप या पक्षात काय फरक आहे सांगितलं. काँग्रेसनं सहा दशकं देशाचं वाटोळं केलं. देशाच्या प्रश्नांवर कायमचं उत्तर शोधण्याचा काँग्रेसने कधीच प्रयत्न केला नाही. 60 वर्षात काँग्रेसनं देशात खड्डेच खड्डे खोदून ठेवले आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात केली. देशाच्या प्रश्नांवर आम्ही नेहमीच कायमची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. तर काही लोकांची वक्तव्य देशाला निराश करतात, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola