Pm Modi Rally Mumbai : मोदी-राज सभेचे पडसाद, दोन मुंबईकर मित्र एकमेकांत भिडले

Continues below advertisement

Mahayuti Sabha at Shivaji Park : मुंबई : लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election 2024) पाचवा टप्पा येत्या 20 मे रोजी पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईत (Mumbai News) सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे. पाचव्या टप्प्यातील महायुतीची (Mahayuti) सांगता सभा आज दादरमधील (Dadar) शिवाजी पार्कवर (Shivaji Park) होणार आहे. आजच्या सभेसाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उपस्थित राहणार असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) देखील हजेरी लावणार आहेत. पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर येणार आहेत. त्यामुळे आजच्या महायुतीच्या सभेकडे संपूर्ण राज्याचंच नाहीतर देशाचंही लक्ष लागलं आहे. तसेच, आज सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबईत रोड शो देखील होणार आहे. याच पार्श्वभूमीवर दादर परिसरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.  

महायुतीच्या सभेची सांगता मोदींच्या भाषणानं 

मुंबईत आज महाविकास आघाडी आणि महायुतीच्या दोन मोठ्या सभा होत आहेत. महाविकास आघाडीच्या सभेसाठी शरद पवार, अरविंद केजरीवाल, मल्लिकार्जुन खर्गे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर असतील मात्र प्रश्न हा आहे की, मुख्य भाषणाची आणि शेवटच्या भाषणाची संधी कुणाला मिळणार? तर दुसरीकडे मनसेची स्थापना झाल्यानंतर शिवाजी पार्कवर पहिल्यांदाच राज ठाकरे यांना शेवटचं भाषण करता येणार नाही.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram