PM Modi Varanasi : मोदींनी वाराणसी मतदारसंघातून तिसऱ्यांदा भरला अर्ज : ABP Majha
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मोदींनी वाराणसी मतदारसंघातून तिसऱ्यांदा अर्ज भरला. अर्ज दाखल करण्यापूर्वी मोदींनी गंगापूजन केलं. त्यानंतर काल भैरव मंदिरात आरती केली. काही वेळाने ते जिल्हाधिकारी कार्यालयात गेले आणि अर्ज दाखल केला. त्यानंतर शाह, नड्डा, एकनाथ शिंदे, योगी आदित्यनाथ यांच्यासह केंद्रीय मंत्री तसंच एनडीए नेत्यांच्या उपस्थित शक्तिप्रदर्शन केलं.