Opposition Meeting in Bengaluru Live Updates: बंगळूरुमध्ये भाजपविरोधात बैठक, 26 पक्षांचा सहभाग
abp majha web team
Updated at:
18 Jul 2023 10:03 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाजप विरोधकांसाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. कारण भाजप विरोधकांची आज दुसरी बैठक बंगळुरूमध्ये होतेय. बंगळुरूमधील ताज वेस्ट एंड हॉटेलमधील या बैठकीत तब्बल २६ विरोधी पक्ष सहभागी होतायंत. ११ वाजता बैठक सुरू होईल आणि अंदाजे ४ वाजता संपेल. त्यानंतर सर्व विरोधक एकत्र पत्रकार परिषद घेतील. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात कोणती रणनीती आखायची, किमान समान कार्यक्रम तसेच उमेदवार कसे द्यायचे यावर चर्चा अपेक्षित आहेत. यापूर्वी पाटण्याच्या झालेल्या विरोधकांच्या बैठकीत 15 पक्ष सहभागी झाले होते तर यावेळी २६ पक्ष सहभागी झालीते, हे विशेष.