Onion Farmer Loss : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा फटका, 40 टक्के कांदा सडला
परतीच्या पावसाचा कांद्याला फटका बसलाय. पावसामुळे चाळीत साठवलेला जवळपास 30 ते 40 टक्के कांदा सडलाय. पाऊस सुरुच असल्याने नवीन कांदा यायलसा वर्ष अखेर किंवा नवीन वर्ष उजाडणार आहे. त्यातही कांद्याचे उत्पादन निम्माने घटलंय. शिवाय कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव होण्यची शक्यता आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय.