One country one Election : एक देश एक निवडणूक सह 10 विधेयकांची चर्चा : ABP Majha
Continues below advertisement
केंद्र सरकारने १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलंय. त्यामुळे वेगळ्याच वादाला तोंड फुटलाय. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्वीट करत याची काल माहिती दिली. पण अधिवेशन कशासाठी हे गुलदस्त्यात असल्याने विरोधक केंद्र सरकारवर प्रचंड नाराज आहेत. तर एक देश एक निवडणूक यासह १० विधेयक मांडले जाण्याची चर्चा होतेय. दरम्यान, याच कालावधीत महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धामधूम असल्यामुळे विरोधक संतप्त झालेत. विशेष अधिवेशात भाजपच्या सर्व खासदारांनी आपली कामं रद्द केल्याची माहिती मिळतेय
Continues below advertisement